बंगळुरु ९ वर्षांनी अंतिम फेरीत   

मुल्लानपूर/ मोहाली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलमध्ये एक शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये पंजाब किंग्जचा ८ फलंदाज राखून पराभव केला. आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा बंगळुरु पहिला संघ ठरला. ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बंगळुरु पुन्हा एकदा आयपीएलच्या अंतिममध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला. बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदारने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. आणि संपूर्ण संघ फक्त १०१ धावांवर बाद झाला. बंगळुरुने १० षटकांत हे लक्ष्य सहज गाठले.
 
आरसीबी संघाने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यापूर्वी संघाने २००९, २०११ आणि २०१६ चे आयपीएलचा अंतिम सामना खेळले होते, परंतु तिन्हीमध्ये संघाचा पराभव झाला. आता आरसीबी संघ  ९ वर्षांनी पुन्हा अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि यामुळे हा संघ विजेतेपद जिंकू शकेल अशी सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. चालू हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने गुणतक्त्यामध्ये दुसरे स्थान मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांनी कोणतीही घाई दाखवली नाही. विराट कोहली १२ धावा तर मयंक अग्रवाल १९ धावा करून बाद झाला. पण फिल सॉल्टने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. पंजाबचे सर्व गोलंदाज मोठे अपयशी ठरले. सॉल्टने सामन्यात ५६ धावांची खेळी खेळली. कर्णधार पाटीदारने षटकार मारून संघाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. 

संक्षिप्त धावफलक 

बंगळुरु: फिल सॉल्ट ५६, कोहली १२, मयांक अगरवाल १९, रजत पाटीदार नाबाद १५, अवांतर ४ एकूण १० षटकांत १०६/२
पंजाब : प्रियांश आर्या ७, प्रभासिमरन १८, श्रेयस अय्यर २ नेहल वाढेरा ८,स्टोयनिस २६, अझमतुल्ला १८, शशांक सिंग ३ एकूण १४.१ षटकांत १०१/१०

Related Articles